Farmer news : शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्य सरकारची 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर !

Vijay Golande
 न्यूज स्टेटस सेवन प्रतिनिधी !
मुंबई : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
अवकाळी पाऊस, दुष्काळ, बाजारभावातील चढ-उतार आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील लाखो शेतकरी या निर्णयाकडे आशेने पाहत होते.
योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या पात्र पीक कर्जावरील थकबाकीची २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम माफ करण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.
शासनाने जाहीर केलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर शासन निर्णय आणि लाभार्थ्यांची प्रक्रिया लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
"कर्जमुक्तीचा दिलासा, समृद्धीची नवी आशा" या घोषवाक्यासह सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
To Top