सुपा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी खून करून मृतदेह मुरूमाच्या ढिगा-यात गाढून ठेवणा-या आरोपीस कर्नाटक राज्यातून शिताफीने अटक
मोरगाव - कर्नाटक राज्यातून बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने सुपा ता. बारामती येथे आलेल्या गणेश शंकर चव्हाण वय ४९ वर्षे, रा. आंद्रफळी ता. शिराटी, जि.गदक, राज्य कर्नाटक याचा खून झाला असल्याची घटना बारामती तालुक्यातील रा.नारोळी येथे झाली होती हा खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या सुपा पोलिसांनी दमदार कामगिरी करत आवळल्या असून या आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बारामती तालुक्यातील नारोळी येथे बांधकाम व्यवसायाचे निमित्ताने आलेल्या गणेश शंकर चव्हाण हा बेपत्ता झाले असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र ज्या फार्म हाऊस चे बांधकाम चालू होते तेथील जवळच असणाऱ्या मुरमाच्या ढीगा- याजवळ उग्र वास येत असल्याची माहिती या फार्म हाऊसच्या मालकीण छाया महाडिक यांनी पोलिसांना कळवली होती. अधिक तपास करत मिसिंग झालेल्या व्यक्तीचाच हा मृत्यदेह असल्याचा संशय पोलिसांना आला होता . यावरून सदर व्यक्तीचा अज्ञात कारणावरून खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना बोलावुन मृत व्यक्तीची खात्री केली. नातेवाईकांनी सदर मृतदेह ओळखुन गणेश शंकर चव्हाण यांचा असल्याचे सांगितले.
सदर घटनेच्या प्रथमदर्शी तपासात मयताचा खुन हा नागराज उर्फ नागेश विरूपक्षाअप्पा गडियप्पनवर वय ३४ वर्ष, रा. असुंडी ता.राणेबेन्चुर जि. हावेरी राज्य कर्नाटक याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून खुन केल्याचा निष्पन्न झाले होते .सदर बाबत रूपेश दिनानाथ साळुंखे पो. हवालादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामे नागराज उर्फ नागेश विरूपक्षाअप्पा गडियप्पनवर वय ३४ वर्ष, रा. असुंडी ता. राणेबेन्दुर जि. हावेरी राज्य कर्नाटक याचेविरूध्द सुपा पोलीस स्टेशन भा.न्या. संहिता कलम १०३,२३८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सुपा पोलीस स्टेशनचे सपोनि मनोजकुमार नवसरे , यांनी आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या २ टिम तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या व तपास पथके रवाना केली.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक माहिती तसेच गोपनिय माहीतीचे आधारे सदर आरोपी हा ता. राणेबेन्नूर जि. हावेरी, राज्य कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि नवसरे, यांनी पोसई जिनेश कोळी यांचे नेतृत्वाखाली पो.हा. रुपेश सांळुखे, पोशि. किसन ताडगे, निहाल वणवे अशी पोलीस स्टेशनची १ टिम आरोपीचे ता.राणेबेन्नुर जि.हावेरी राज्य कर्नाटक येथे रवाना केली. सदर पथकाने ता. राणेबेन्नुर जि. हावेरी राज्य कर्नाटक येथे जावुन स्थनिक पोलीस, तसेच गोपनिय बातमीदाराचे मदतीने आरोपीचा शोध घेतला व त्यास शिताफीने ताब्यात घेतले. तसेच आरोपीस पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशन येथे आनुन त्याचेकडे गुन्हाचे अनुषंघाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुली दिली. तसेच सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपीस अटक करून मा. न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने आरोपीस चार दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे. पुढील तपास जिनेश कोळी पोलीस उपनिरीक्षक सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी संदिपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक, गणेश बिरादार अपर पोलीस अधिक्षक , सुदर्शन राठोड .उप.विभागीय पोलीस अधिकारी यांचें मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पो.स.ई.जिनेश कोळी, पोसई जयंत ताकवणे, पो.हवा. रुपेश साळुंके, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो. कॉ. तुषार जैनक, किसन ताडगे, सागर वाघमोडे, महादेव साळुंके, निहाल वणवे यांनी केलेली आहे.