Electric shock | विजेचा शॉक लागून मेंढपाळचा मृत्यू


मोरगाव : तरडोली ता. बारामती येथील मेंढपाळ व्यवसायिकाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. कुपनलिकेची वायर नादुरुस्त असल्यामुळे  जोडत असताना त्यांना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की बारामती तालुक्यातील तरडोली येथील तात्या संपत मासाळ वय वर्ष 33  यांचा मेंढपाळाचा व्यवसाय आहे. हे त्यांच्या शेतामध्ये आज सकाळी गेले होते. तिथे त्यांचा मेंढ्यांचा गोठा आहे. मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी ते गोठ्यावरील कूपनलिका सुरू करत होते. मात्र कूपनलिका सुरू होत नसल्याने तेथे काही नादुरुस्ती झाली आहे का हे पाहत असताना त्यांना विजेचा शॉक लागला.  या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. एक मनमिळावू व होतकरू व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध होते.
To Top