Loni bhapkar news ! निसर्गाचा चमत्कार! जर्सी गाईला एकाच वेळी तीन वासरे !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी  : 
बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावात निसर्गाने आपला अनोखा चमत्कार दाखवला असून एका शेतकऱ्याच्या जर्सी गाईने एकाच वेळी तीन वासरांना जन्म दिला आहे. ही घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात असून परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

लोणी भापकर येथील शेतकऱी रमेश रघुनाथ भापकर व त्यांच्या पत्नी प्राची रमेश भापकर यांनी सांगितले की, गाईला प्रसूती वेळी कोणताही गंभीर त्रास झाला नाही. नैसर्गिक पद्धतीने प्रसूती पार पडली. गाईची आम्ही काळजी घेत असुन तिला योग्य आहार देत आहोत. विशेष म्हणजे तिन्ही वासरे आणि गाय सध्या पूर्णपणे निरोगी असून त्यांची  वैद्यकीय तपासणी केली आहे.

पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जर्सी गाईला एकाच वेळी तीन वासरांचा जन्म होणे ही अतिशय क्वचित घडणारी घटना आहे. योग्य आहार, काळजी आणि नैसर्गिक कारणांमुळे असा प्रसंग घडू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्याच्या गोठ्याकडे भेट देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी या घटनेला निसर्गाची कृपा तर काहींनी चमत्कार असे संबोधले आहे.
या दुर्मिळ घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून संपूर्ण गावात उत्सुकता आणि कौतुकाचा सूर पाहायला मिळत आहे.
................

To Top