Crime news : तांत्रिक तपासाच्या जोरावर ७ मोबाईलचा शोध; माळेगाव पोलिसांचे कौतुक !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी : 
बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याने हरवलेले तब्बल १ लाख ५६ हजार ५८५ रुपये किमतीचे सात मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत देत नागरिकांचा विश्वास जिंकला आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांच्या हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ती परत मिळवून देण्याच्या मोहिमेंतर्गत पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. माळेगाव पोलीस ठाण्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबवली.
तपासादरम्यान कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून एकूण सात मोबाईल हस्तगत करण्यात आले. यामध्ये सॅमसंग, वनप्लस, विवो आणि ओप्पो कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश असून त्यांची एकूण किंमत १ लाख ५६ हजार ५८५ रुपये इतकी आहे.
तक्रार निवारण दिनानिमित्त शनिवारी (दि. १३ जून) संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईलधारकांनी आनंद व्यक्त करत माळेगाव पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी पार पाडली.


To Top