Nivad : बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे तर उपसभापतीपदी शुभांगी आगवणे यांची बिनविरोध निवड !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7  प्रतिनिधी  :
राजकीय पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी सांगवी येथील किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापती पदी गुणवडी पंचायत समिती गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड करण्यात आली आहे. 
किरण तावरे हे पणदरे गटातून पंचायत समितीसाठी निवडून आले आहेत. त्यांच्या कामाचा अनुभव आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिरायती भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही जबाबदारी दिली असावी असे बोलले जात आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. किरण तावरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे या यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे तावरे कुटुंबाला स्थानिक राजकारणाचा मोठा अनुभव असल्याचे मानले जाते. दरम्यान, ही निवड महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 
सभापतीपदी निवड झाल्यानंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शेतकरी, महिला आणि युवकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
........
To Top