Loni news : दोन महिने उलटले तरी चोर मोकाट; निष्क्रियतेविरोधात आंदोलनाचा इशारा !

Vijay Golande
 न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी :
लोणी भापकर, (ता.बारामती) येथील स्मशानभूमीतील शवदाहिनी सुमारे दोन  महिन्यांपूर्वी चोरीला गेल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेचा अद्यापपर्यंत कोणताही तपास लागलेला नाही तसेच पोलिसांकडून चोरांचा शोधही लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शवदाहिनी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही अद्याप नवीन शवदाहिनी बसविण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने नवीन शवदाहिनी बसवावी, अशी मागणी बलुतेदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

"चौकट" :
“दोन महिने उलटूनही  चोरीप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तसेच प्रशासनाकडून नवीन शवदाहिनी बसविण्यात आलेली नाही. ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून तातडीने शवदाहिनी बसवावी, अन्यथा बलुतेदार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दादा कडाळे, धीरज आवाडे, सचिन कांबळे,प्रताप कडाळे, मयूर खोमणे, दीपक पवार या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
........
To Top