लोणी भापकर ( ता. बारामती ) येथे पंचक्रोशी व परिसरातील ग्राहकांसाठी एक नवे आणि विश्वासार्ह केंद्र म्हणून स्वयंभू बॅटरीज अँड इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जेष्ठ समाजसेवक हनुमंतराव गोलांडे व माजी सरपंच रवींद्र भापकर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सायंबाचीवाडी गावचे सरपंच जालिंदर भापकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या शुभेच्छा देताना सांगितले की, “स्वयंभू बॅटरीज अँड इलेक्ट्रिकल्स हे दुकान ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाच्या बॅटऱ्या व इलेक्ट्रिकल साहित्य योग्य दरात उपलब्ध करून देईल, अशी खात्री आहे.”
दुकानामध्ये विविध प्रकारच्या इन्व्हर्टर बॅटऱ्या, वाहन बॅटऱ्या, सोलार बॅटऱ्या तसेच इतर इलेक्ट्रिकल साहित्य उपलब्ध आहे. ग्राहकांना उत्तम सेवा व दर्जेदार उत्पादने देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी माजी उपसरपंच शरद भापकर, ग्रामपंचायत सदस्य रामदास भापकर, सामाजिक कार्यकर्ते जयवंत भापकर, सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव विजयसिंह भापकर, दादा जाधवराव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस एल भापकर, स्वयंभुनगर सोसायटीचे माजी सचिव मारुती घाडगे, स्वयंभूनगर सोसायटीचे संचालक बाळासाहेब झणझणे, दलित पँथरचे तालुका अध्यक्ष अविनाश बनसोडे, भूमिपुत्र पतसंस्थेचे सचिव विजय पाटोळे, पोलीस पाटील संजय गोलांडे,सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय कांबळे, लालासाहेब गोलांडे यांच्यासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
..........

