Palkhi sohala ! “फुलला भक्तीचा मळा; लागला बाळू मामांचा लळा” !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन  प्रतिनिधी  :
लोणी भापकर ( ता. बारामती )येथे संत बाळुमामा पालखी  व पवित्र बकरी गावात दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गेल्या चार दिवसांपासून गावात अखंड नामस्मरण, कीर्तन, भजन आणि गजीनृत्याचा गजर सुरू असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान, श्रद्धेची झळाळी आणि भक्तीचा दरवळ दिसत होता.
अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठानच्या वतीने ठोंबरे वस्ती, गडदे वस्ती, कोळेकर वस्ती आणि लांबाते वस्ती  वरील युवक, युवती, महिला, पुरुष व ग्रामस्थांनी संत बाळूमामा पालखी बग्गा नंबर चार व  3 हजार 500 पवित्र बकऱ्यांची अत्यंत भक्तिभावाने  सेवा केली. मुक्कामासाठी आवश्यक असलेली सर्व व्यवस्था प्रेमाने व समर्पणाने करण्यात आली. दररोज कीर्तन व भजनाच्या  माध्यमातून बाळुमामांच्या चरित्राचे आणि शिकवणीचे स्मरण करण्यात आले. अन्नदानाच्या पुण्यकार्यामुळे अनेक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
या तीन दिवसांच्या मुक्कामाने गावात आध्यात्मिक ऊर्जा, एकोपा आणि भक्तीभाव अधिक दृढ झाला असून ग्रामस्थांच्या मनात हा सोहळा कायम स्मरणात राहील. अशा या भक्तिमय वातावरणात फुलला भक्तीचा मळा; लागला बाळू मामांचा लळा” अशी हाक  देत पालखी सोहळ्याला निरोप देण्यात आला.
 या कार्यक्रमात अमोल ठोंबरे, नामदेव ठोंबरे, बापू ठोंबरे, निलेश ठोंबरे, अविनाश ठोंबरे, दीपक ठोंबरे,  राजेंद्र गडदे, संदीप ठोंबरे, नवनाथ ठोंबरे, आबा ठोंबरे, मयूर कोळेकर,गणेश कोळेकर, दादा गडदे, अर्जुन गडदे, भिवा गडदे,  रामभाऊ गडदे, स्वरूप गडदे, नामदेव गडदे, शामराव गडदे ,मिनीनाथ ठोंबरे, लाला ठोंबरे, सुमित ठोंबरे, नायकू ठोंबरे, संतोष ठोंबरे, योगेश ठोंबरे, सुजित ठोंबरे, अक्षय ठोंबरे, वैभव ठोंबरे, काका ठोंबरे, माणिक ठोंबरे, मामा ठोंबरे, साधू ठोंबरे,  खंडू ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक  रवींद्र लांबाते,  शरद लांबाते, बाळू लांबाते, सचिन लांबाते, रामभाऊ  लांबाते, सनीदेव लांबते, हेमंत लांबाते, अनिल लांबाते, रुपेश लांबाते, भरत लांबाते व उत्तम नरुटे यांच्यासह महिलावर्गांने उस्फूर्तपणे सहभाग घेऊन संत बाळूमामा पालखी सोहळ्याची मनोभावे सेवा केली. या संपूर्ण पालखी सोहळ्याची देखरेख व नियोजन हलप्पा कारभारी सुरनवर यांनी पाहिले.
................

To Top