punyatithi ! लोणी भापकरला राजे उमाजी नाईक पुण्यतिथी उत्साहात साजरी !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी : 
लोणी भापकर, (ता. 3) स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी लोणी भापकर येथे ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच रवींद्र भापकर, नीरा मार्केट कमिटीचे माजी संचालक सुरेश मदने, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच नंदकुमार मदने, माजी उपसरपंच संतोष खैरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज मदने, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीप जगदाळे, बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष दादा कडाळे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसो मदने, दिलीप धायगुडे, अमोल मदने, सचिन मदने, सचिन खोमणे, महेश खोमणे, भिमराव पवार, अभिजीत पवार, , ऋतिक पवार, शुभम खोमणे, महेश बनसोडे, नितीन गोलांडे आदी उपस्थित होते.
 
 कार्यक्रमाची सुरुवात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून राजे उमाजी नाईक यांच्या शौर्य, पराक्रम व सामाजिक न्यायासाठी दिलेल्या लढ्याचा आढावा घेतला. त्यांच्या कार्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात रामोशी समाजाचा सहभाग अधिक बळकट झाला, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजे उमाजी नाईक यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. 
.........
......
To Top