Gav band : लोणी भापकरकरांची गाव बंदची हाक ! अजित पवारांचा घात की अपघात ? अनेक प्रश्न अनुत्तरित, संशय गडद ! गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी केली सखोल तपास करण्याची मागणी !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी : 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा झालेला अपघात हा केवळ दुर्दैवी घटना होती, की सत्तेच्या वर्तुळाला हादरवणारा घात हा प्रश्न आता जोर धरू लागला आहे. प्रशासनाकडून हा अपघात असल्याचा दावा केला जात असला, तरी घटनेभोवती उभे राहिलेले प्रश्न आणि संशय दुर्लक्षित करता येण्यासारखे नाहीत त्यामुळे लोणी भापकर ग्रामस्थांनी व बलुतेदार संघटनेने गाव बंद ठेवत या घटनेच्या उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केलीआहे.
   28 जानेवारी रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. मात्र अपघात घडताच अवघ्या काही तासांत “हा अपघातच होता” असा निष्कर्ष काढण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
अपघात नेमका कसा झाला?
हवामान अचानक इतके बिघडले होते का?
विमानाच्या तांत्रिक तपासणीचा अहवाल आधीच क्लिअर होता का?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतक्या संवेदनशील व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची?
या सर्व प्रश्नांची ठोस उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.
राजकीय वर्तुळात या घटनेबाबत “घात” असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अलीकडेच काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे चर्चेत होते. त्यांच्या निर्णयांमुळे काही शक्तींना धक्का बसला होता का, हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. 
दरम्यान, तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फुटेज, विमानाचा ब्लॅक बॉक्स, तांत्रिक अहवाल आणि वैमानिकांच्या निवेदनांच्या आधारे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चौकशीची दिशा आणि गती पाहता, सत्य बाहेर येईल की प्रकरणावर पडदा टाकला जाईल, अशी भीती ग्रामस्थांन कडून व्यक्त केली जात आहे.
लोणी भापकर ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत या घटनेच्या उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली असून, “हा अपघात नसेल, तर सत्य लपवले जात आहे का?” असा थेट सवाल केला आहे. जनतेमध्येही प्रचंड अस्वस्थता असून, केवळ औपचारिक तपास नको, तर पारदर्शक चौकशी व्हावी, अशी अपेक्षा लोणी भापकर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघातामागचे सत्य काय—घात की अपघात हे लवकरात लवकर समोर येणे राज्याच्या लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण हा प्रश्न केवळ एका नेत्याच्या मृत्यूचा नाही, तर सत्तेतील सुरक्षितता आणि पारदर्शकतेचा आहे.
........



To Top