Crime news ! बारामती हादरली: पोलीस अधिकाऱ्याची भीषण आत्महत्या, मृतदेहाचे दोन तुकडे !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 बारामती | प्रतिनिधी :
बारामती शहरात वाढत चाललेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मानसिक तणाव, दीर्घ आजारपण, आर्थिक अडचणी, कर्ज व सावकारी तगादा अशा विविध कारणांमुळे अनेक जण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
दरम्यान अशाच पार्श्वभूमीवर बारामतीत एक धक्कादायक घटना आज उघडकीस आली असून, मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक रमेश बनसोडे  रा. कसबा, बारामती  यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शहरातील रेल्वे उड्डाण पुलाजवळ रेल्वे ट्रॅकच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रमेश बनसोडे हे दीर्घकाळ आजारपणाने त्रस्त होते. त्यातून मानसिक तणाव वाढून त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. स्थानिक नागरिकांच्या लक्षात मृतदेह आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बारामती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शवविच्छेदन अहवाल व अधिकृत तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, वाढत्या आत्महत्यांच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
........

To Top