Tiranga ! प्रजासत्ताक दिनासाठी बारामतीत खादी भांडारात राष्ट्रध्वजाला चांगली मागणी !

Vijay Golande
बारामती प्रतिनिधी  :  देशाचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला ध्वजारोहणा साठी खादीचे मान्यताप्राप्त विविध साईज मधील तिरंगा झेंड्याला बारामतीत चांगली मागणी असल्याची महिती" सागर खादी भांडारचे चालक "ध्वज विक्रेत्या ' मालिनी जन्नू ' यांनी दिली.

हातमागावर विणलेल्या कपडा पासून खादी राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात येते,ध्वज संहितेनुसार विविध साईज मधील ध्वजाची निर्मिती केली जाते, आपल्या देशात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, एक मे महाराष्ट्र दिन या करिता ध्वजा रोहण करण्याची परंपरा आहे, या साठी विविध सामाजिक संघटना, संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा,सेवा संघटना यांच्या कडून राष्ट्र ध्वजाला चांगली मागणी असतें, अशी महिती खादी भांडार मधून देण्यात आली,

तिरंगा ध्वज या मध्ये दीड बाय दोन,दोन बाय तीन, तीन बाय साडेचार,चार बाय सहा,सहा बाय आठ,अश्या साईज मधील खादीचे झेंडे विक्री साठी उपलब्ध आहेत,सर्व सामान्य नागरिकांनी तिरंगा झेंडे खादी भांडार मधूनच खरेदी करावी, म्हणजेच ग्राहकांची फसवणूक होणार नाही, हल्ली प्लास्टिक, मधील आणि नॉयलान, टेरिकोट, पॉलिस्टर कपड्या मधील तिरंगा ध्वज बाजारात विकत मिळतात, त्या झेंड्याना मान्यता नाही,अशी महिती" सागर खादी भांडार "मधील विक्रेते 'जन्नू 'यांनी दिली.

तिरंगा ध्वज संहितेचे पालन करावे,तिरंगा ध्वज हा फाटलेला, मळलेला,आणि चूरगळलेला नसावा,तिरंगा ध्वज हा व्यवस्थित पद्धतीने साईज मधील असावा,
कोणत्याही गोष्टी साठी तिरंगा ध्वजचा वापर होता कामा नये,तिरंगा राष्ट्रध्वज     फडकविताना भगवा - नारंगी कलर नेहमीच वरच्या बाजूला असावा, यांची काळजी घ्यावी, ध्वजा रोहण करताना ध्वजा मध्ये फुले, हार,ठेवू नये,
अशी महिती सुद्धा  मालिनी जन्नू यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना दिली.
 
स्वतंत्रपुर्व काळा पासून बारामतीत सागर खादी भांडार हे स्वदेशी कापडं दुकान आहे, १९४२ च्या चळवळीत या दुकानाची सुरुवात झाली, "स्वदेशी वापरा देश वाचवा ",हा नारा या काळात देण्यात आला होता,आज या दुकानात तिसरी पिढी स्वदेशी खादी विक्रीची परंपरा कायम ठेवलेली आहे. 
To Top