School ! विद्या प्रतिष्ठान सीबीएसई शाळेत ‘कला हेच जीवन’ कार्यशाळा उत्साहात संपन्न !

Vijay Golande
बारामती  प्रतिनिधी :
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल (सीबीएसई), बारामती येथे इयत्ता ५वी ते ९वीच्या सुमारे ११० विद्यार्थ्यांसाठी “कला हेच जीवन (Art is Life)” या विषयावर प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन दि. १६ जानेवारी २०२६ रोजी शाळेच्या सभागृहात करण्यात आले.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार व व्याख्याते डॉ. शिवाजी गावडे यांनी कला म्हणजे केवळ चित्रकला नसून जीवन जगण्याची दृष्टी आहे. समाजात कला व कलाकार नसतील तर अतिरेकी विचारांना चालना मिळते असे प्रतिपादन केले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय श्री. मनोज कुंभार सर यांनी केला, तर आभार प्रदर्शन श्री. संदीप यादव सर यांनी केले. प्राचार्या राधा कोरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला मा. कोरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उद्देश विशद केला. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले. कार्यशाळेदरम्यान शाळेच्या समन्वयिका वसुंधरा महाडिक याही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या चित्रकला विभागाने केले.
To Top