शेतकऱ्याची फसवणूक करून जेसीबी मशीन व ट्रॅक्टर लांबवणाऱ्या टोळीचा सुपा पोलीस स्टेशनच्या पथकाने पर्दाफाश केला असून, या कारवाईत सुमारे ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नदिड धाराशिव येथील शेतकऱ्यांची जेसीबी मशीन भाड्याने घेऊन ते सासवड येथील नव्याने होणाऱ्या विमानतळ कामाकरिता लावतो असे म्हणून शेतकच्याशी करारनामा करून घेऊन त्या जेसीबी वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीचा सुपा पोलीस स्टेशनने पर्दाफाश केला आहे. बालाजी गोविंदराव गादेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशन येथे दिनांक ०६/०१/२०२६ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १/२०२६ भारतीय न्याय संहिता ३३८,३३६,३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. शेतकरी बालाजी गोविंदराव गादेवाड यांच्याबरोबरच शेतकरी अनिल शिवाजी वरखडे बाबुराव व आप्पाराव पांढरे यांच्याशी आरोपी यांनी शंभर रुपयाचे स्टॅम्प वरती करार करून त्यांना तुमचे जेसीची वाहन सासवड येथील नव्याने होणाऱ्या विमानतळाचे कामावर लावतो असे म्हणुन सदरचे काम हे आमचे वी.जी. कंट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. आम्ही तुमचे जेसीबी वाहन घेऊन जाऊन प्रति महिना एक लाख रुपये प्रमाणे भाडे देतो असे सांगून आरोपी १) अजय संतोष चव्हाण रा. सरतळे ता. जावळी जि. सातारा २) दिनेश भाऊराव मोरे रा. इकलीबोर ता. नायगाव जि. नांदेड ३) निलेश अण्णा थोरात राहणार मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे ४) तुषार शहाजी शिंदे रा.येडशी ता. भाराशिव जि. भाराशिव यांनी फसवणूक केली आहे.
आरोपी अजय संतोष चव्हाण व निलेश थोरात यांनी दिनेश भाऊराव मोरे, तुषार शिंदे यांच्याशी संगणमत करून डिसेंबर २०२५ मध्ये शेतकर्यांकडून जेसीबी मशीन विक्री करण्याच्या उद्देशाने ते सुपे ता. बरामती जि. पुणे येथे घेऊन आले होते. पोलिसांनी त्याबाबत करारनामा तसेब आरोपी अजय चव्हाण, निलेश थोरात व तुषार शिंदे यांनी बनावटीकरण करून तयार केलेले बी. जी. कंट्रक्शन कंपनीचे बनावट कागदपत्रे तपासामध्ये हस्तगत करण्यात आली आहेत.
आरोपी निलेश थोरात हा सदरच्या जेसीबी वाहनांचा विक्री करून त्याची विल्हेवाट लावीत होता असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये धाराशिव येथील दोन ट्रॅक्टर तसेच नांदेड येथील तीन जेसीबी आरोपी निलेश थोरात यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत आरोपी निलेश थोरात यास अटक केली आहे त्यास दि. १६/०१/२०२६ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाले आहे. पोलीस कस्टडी मध्ये असताना आरोपी निलेश थोरात याने दोन ट्रॅक्टर मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे येथील शेतकऱ्यांना फायनान्स कंपनिचे ट्रॅक्टर असल्याचे सांगुन त्याचे कागदपत्रे बोड्याच दिवासात देतो असे सांगून सदरचे ट्रॅक्टर विकी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुपा पालीस स्टेशन गु.र.न. १/२०२६ मधील ३ जेसीबी मशीन तसेच कळंब पोलीस स्टेशन जि. धाराशिव येथील गु.र.न.४५८/२०२५ मधील १ ट्रॅक्टर व इतर १ ट्रॅक्टर असे एकूण ३ जेसीबी मशीन व २ ट्रॅक्टर असे ७७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी हे करीत आहेत.
सदरची कामगौरी ही मा. संदीपसिंह गिल्ल साो, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार सो. अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बारामती, यांचे मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री मनोजकुमार नवसरे सो. पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवलदार राहुल भाग्यवंत, पोलीस हवलदार संदीप लोंढे, पोलीस हवलदार रुपेश सांळुखे, पोलीस हवलदार दत्ता घुमाळ, पोलीस हवलदार संतोष पवार, पोलीस हवलदार विशाल गजरे, पोलीस शिपाई किसन ताडगे, पोलीस शिपाई महादेव साळुंखे, पोलीस शिपाई तुषार जैनक, पोलीस शिपाई सागर वाघमोडे, पोलीस शिपाई निहाल वणवे, पोलीस शिपाई सचिन कोकणे, पोलीस शिपाई सचिन दरेकर, पोलीस शिपाई योगेश सरोदे, पोलीस शिपाई पियुष माळी, पोलीस शिपाई आदेश मवाळ यांनी केली आहे.
..............

