बारामती येथे इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) बारामती-फलटण शाखेच्या २०२६ साठी कार्यकारिणी निवड समारंभ दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी येथे साजरा करण्यात आला. या समारंभात डॉ. सोनिया शाह यांची अध्यक्षपदी, डॉ. केतकी नाळे यांची सचिवपदी आणि डॉ. मनोज गांधी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. शर्मिला ताई पवार होत्या. नूतन पदाधिकारी यांचा सत्कार ताईंनी केला व उपस्थितांना मार्गदर्शन केले.सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. अशोक तांबे, डॉ. संतोष घालमे, डॉ. प्रदीप खलाटे आणि डॉ. वैभव काटे-देशमुख यांची उपस्थिती लाभली. विशेष अतिथी म्हणून डॉ.जे. जे. शाह, डॉ.सुयश शाह आणि डॉ. संकेत नाळे यांसह डॉ अशोक वोहरा, डॉ. प्रदीप वोहरा, डॉ. राजेंद्र डोशी, डॉ. सुधा शिंदे, डॉ. प्रिती शाह, डॉ. वैशाली कोकरें, डॉ. दीपक दोशी, डॉ. पांडुरंग जिरगे, डॉ. प्रितेश दोशी, डॉ. चेतन गुंडेचा, डॉ. रोहित संघवी, डॉ. वैशाली जिरगे, डॉ. अपूर्वा तावरे, डॉ. श्रध्दा कवडे यांसारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
नव्या कार्यकारिणीचे प्रमुख उद्दिष्ट ‘तंबाखूमुक्त बारामती’ ही मोहीम राबवणे आहे. आयडीए बारामती-फलटण शाखेतील सर्व सदस्यांनी या उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा दिला असून, तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रतिबंधासाठी व्यापक जागृती मोहीमेचा विस्तार केला जाणार आहे.
या समारंभाने शाखेच्या नव्या कार्यकाळाला औपचारिक सुरुवात झाली असून, आरोग्य क्षेत्रातील योगदान वाढविण्याबाबतचा संकल्प पुन्हा एकदा दृढ झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा कवडे व डॉ. अपूर्वा तावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ केतकी नाळे यांनी केले.
.............

