sahvichar sabha ! बारामती तालुका मुख्याध्यापक सहविचार सभा उत्साहात संपन्न !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 बारामती प्रतिनिधी  :
बारामती तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व लिपिक यांची सहविचार सभा नुकतीच बारामती येथील श्री छत्रपती हायस्कूल  येथे उत्साहात संपन्न झाली. शालेय प्रशासन अधिक सक्षम व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी श्री महेश पवार होते. यावेळी  सायकॉलॉजिस्ट रेजशा खान यांनी ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर मुख्याध्यापक व लिपिकांना मार्गदर्शन केले .गुणवत्ता संवर्धन अभियान पुस्तिका वाटप व मार्गदर्शन करून पुढील  नियोजन ठरविण्यात आले.
या सभेसाठी तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सचिव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, कार्यालयीन कामकाजातील अडचणी, शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी, ऑनलाइन व ऑफलाइन नोंदींचे व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापक व लिपिक यांच्यातील समन्वय या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी उपशिक्षणाधिकारी श्री. पवार यांनी
मार्गदर्शन करताना सांगितले की, शाळेच्या यशस्वी कामकाजात मुख्याध्यापक व लिपिक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासनातील अचूकता, वेळेचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन यामुळे शालेय वातावरण अधिक सुदृढ बनते. सहविचार सभांमुळे अनुभवांची देवाणघेवाण होऊन समस्या सोडविण्यास मदत होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या वेळी  सिकंदर शेख, जयवंत नाकुरे, दीपाली ननावरे, आशिष कुलकर्णी, अनिल चोरमले, राजेंद्र धायगुडे, राजेंद्र खोमणे, भगवान भिसे यांच्यासह  बारामती तालुक्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक व लिपिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या अनुभवांवर आधारित सूचना मांडल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, लिपिक व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.   प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी केले 
सुत्रसंचलन मनोहर खोमणे यांनी केले.
शेवटी शाहू हायस्कूलचे प्राचार्य गणपत तावरे यांनी  उपस्थितांचे आभार मानून सहविचार सभेची सांगता करण्यात आली.
.......

To Top