बारामती पंचायत समिती शिक्षण विभाग, बारामती तालुका मुख्याध्यापक संघ व बारामती तालुका गणित-विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ५३ वे बारामती तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या प्रदर्शनात बारामती तालुक्यातील विविध प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, पर्यावरण, तंत्रज्ञान व सामाजिक विषयांवरील नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, संशोधन वृत्तीला व वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता.
बारामती मधील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात हे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर , राज्य मुख्याध्यापक संघाचे नंदकुमार सागर , प्रसाद गायकवाड, बारामतीचे गटशिक्षणाधिकारी श्री निलेश गवळी, विराज खराटे, भगवान भिसे, गणपतराव तावरे यांच्या हस्ते करण्यात आले हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनामध्ये बारामती तालुक्यामधून जवळजवळ शंभर प्रकल्प सादर करण्यात आले होते. प्राथमिक गटात प्रथम क्रमांक कु. प्राजक्ता आबासो मारकड(शारदाबाई पवार इंग्लिश मिडी.शारदानगर),द्वितीय क्रमांक कु. वीरा ओझर्डे(विद्या प्रतिष्ठान इंग्लिश माध्यम बारामती),तृतीय क्रमांक कु. स्वरा नागरगोजे(जनहित प्रतिष्ठान बारामती) यांनी मिळवला. माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक अर्णव बाळू घाडगे(विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश माध्यम बारामती),लायबा खान(उर्दू माध्यमिक विद्यालय बारामती) हिने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक अश्विन लोणकर(वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी)यांनी मिळवला. प्राथमिक शिक्षक गटातून सौ. वर्षा साळुंखे(शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर) यांनी प्रथम क्रमांक तर सौ.दिपाली साळुंखे(जि . प प्राथ.सांगवी) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, माध्यमिक गटामधून प्रथम क्रमांक टेक्निकल विद्यालयातील प्रा.मनोजकुमार वाघमोडे तर द्वितीय क्रमांक मोहन गायकवाड(स्वातंत्र्य विद्यामंदिर वडगाव निंबाळकर) यांनी मिळवला तर दिव्यांग गटामधून नहुश शिंदे(न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती व कु. यादव त्रिशाली अमोल(टेक्निकल विद्यालय बारामती) यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळवले. या विद्यार्थ्यांना बारामतीचे गटविकास अधिकारी श्री किशोर माने व रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी श्री संजय मोहिते तसेच बारामती नगरीचे नूतन नगराध्यक्ष श्री सचिन सातव यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या प्रदर्शनाचे पर्यवेक्षण श्री काळे , मुलानी ,श्री.माळी ,श्री घळके, श्री .महामुनी व श्री आगरकर सर यांच्या टीमने केले. तसेच या प्रदर्शनामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. यातील माध्यमिक गटातील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर विद्यालयाचे प्रथमेश माळवदे आणि मंजिरी घोडके यांनी प्रथम क्रमांक मिळवत यांचे जिल्हास्तरावर निवड झाली आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक बारामती तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री संदीप जगताप यांनी केले तर आभार श्री भगवान भिसे व गणपतराव तावरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास जाधव यांनी केले. यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधून आलेले विद्यार्थी व शिक्षकांनी या प्रदर्शनाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी नंदकुमार सागर, प्रसाद गायकवाड, गणपत गवळी, गणपत तावरे,सिकंदर शेख, मनोहर खोमणे जयवंत नाकुरे, दीपाली ननावरे, आशिष कुलकर्णी, अनिल चोरमले, राजेंद्र धायगुडे, राजेंद्र खोमणे,
उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विभाग, मुख्याध्यापक संघ, गणित-विज्ञान अध्यापक संघ तसेच सर्व शिक्षक व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
...........

