बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व सहेली फौंडेशन बारामती यांचे वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम डोर्लेवाडी (ता.बारामती) येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी नावडकर बोलत होते. यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे, सरपंच सुप्रिया नाळे, सहेली फौंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी आटोळे ग्रामपंचायत सदस्य राणी नेवसे,सचिन निलाखे,अभिनेते रामदास जगताप,पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमनाथ भिले,कार्याध्यक्ष युवराज खोमणे,उपाध्यक्ष राजेश वाघ, सचिव चिंतामणी क्षीरसागर, सुनील जाधव, जयराम सुपेकर,अॅड.गणेश आळंदीकर, महेश जगताप, दत्ता माळशिकारे यांच्यासह संतोष शेंडकर, सुदाम नेवसे, वसंत मोरे, मंगेश कचरे, दीपक जाधव, विनोद पवार, विजय गोलांडे, सचिन पवार, गजानन हागवणे, सुशीलकुमार अडागळे,संतोष भोसले आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नावडकर म्हणाले शासकीय योजनांच्या अंमलबजावणी व जागृतीसाठी वृतपत्रांचे योगदान महत्वाचे आहे.शासनाच्या वतीने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते ही शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय योजना येत असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे व पुण्यातून सुरु होत असलेली जागतिक दर्जाची सायकल स्पर्धा होत आहे.यामध्ये विदेशातील अनेक स्पर्धक सहभाग घेत आहेत.तिसऱ्या टप्यात ही स्पर्धा सासवड-निरा-मोरगाव परिसरातून बारामतीत येत आहे.याबाबतही आपण जागृती करून आपल्या भागातील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थी,तरुण व स्पर्धक पाहता येतील याबाबत आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी देण्यात यावी. यावेळी सहेली फाउंडेशन यांच्या वतीने उपस्थित पत्रकारांचा स्मृतिचिन्ह व वृक्षरोपे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रामभाऊ जगताप,रोहिणी आटोळे यांनी मनोगत व्यक्त केले.पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जयराम सुपेकर यांनी प्रास्ताविक केले.सोमनाथ भिले यांनी सुत्रसंचालन केले.अॅड.गणेश आळंदीकर यांनी आभार मानले.
...........

