राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यावतीने पक्षाच्या अधिकृत कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अजित पवार यांनी कॅलेंडरचे प्रकाशन करून पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. कॅलेंडरमधून पक्षाची विचारधारा, सामाजिक उपक्रम तसेच विकासाभिमुख धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष श्री.संदीप बांदल, शहराध्यक्ष श्री.जय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक व समन्व्वयक दिनदर्शिका श्री.संभाजी होळकर, कार्याध्यक्ष श्री.धनवान वदक, बारामती नगरीचे नगराध्यक्ष श्री.सचिन सातव, माळेगाव नगरपंचांयीतीचे नगराध्यक्ष श्री.सुयोग सातपुते, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस श्री.बाळासाहेब आगवणे, मा.शहर युवक अध्यक्ष श्री.अमर धुमाळ, शहर युवक अध्यक्ष श्री.अविनाश बांदल, नगरसेवक श्री.जयदीप तावरे व इतर मान्यवर उपस्थित होते. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध स्तरांतील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांनी कॅलेंडर प्रकाशन सोहळ्याचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
...........

