Deputy Sarpanch ! काऱ्हाटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रमिला सोनवणे यांची बिनविरोध निवड !

Vijay Golande
न्यूज स्टेट  7 प्रतिनिधी  :
काऱ्हाटी (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रमिला सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
या पूर्वीच्या उपसरपंच शारदा चांदगुडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी प्रमिला सोनवणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी निलेश धारकर यांनी प्रमिला सोनवणे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. 
यावेळी सरपंच दिपाली लोणकर,ग्रामपंचायत सदस्य  उज्वला खंडाळे, शारदा चांदगुडे,रेखा लोणकर, स्वाती जाधव, नम्रता जाधव,लिलाबाई भोसले, काळुराम  वाबळे, विजय चांदगुडे, लक्ष्मण खंडाळे, योगेश लोणकर, धीरज लोणकर, मंगेश दुर्गे सौरभ भोंडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना प्रमिला सोनवणे यांनी ग्रामविकासासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.........

To Top