लोणी भापकर, (ता.बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 ॲम्बुलन्स स्टेशन सुरू करावे तसेच नवीन 108 ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बलुतेदार संघटना व ग्रामस्थांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत परिसरातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, रुग्णांना वेळेवर ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध होत नाही. यामुळे गंभीर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना तातडीची आरोग्यसेवा मिळावी यासाठी लोणी भापकर प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 ॲम्बुलन्स स्टेशन सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी बलुतेदार संघटनेच्या वतीने दादा कडाळे यांनी केली आहे.
........

