Supa police : दरारा निर्माण करणारी सुपा पोलीस स्टेशनची कामगिरी !सव्वा लाख रुपये किमतीचे गहाळ मोबाईल हस्तगत !

Vijay Golande
 न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी :
सुपे ता. बारामती पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले एकूण 7 मोबाईल हँडसेट 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सुपा पोलीसांनी यशस्वीरीत्या हस्तगत करून संबंधित तक्रारदारांना परत केले आहेत.
  
 विविध ठिकाणाहुन मोबाईल हॅण्डसेट गहाळ झालेबाबत सुपा पोलीस स्टेशन येथे तकारी दाखल होत्या. सदर गहाळ मोबाईलचा शोध घेणेबाबत प्रभारी अधिकारी श्री मनोजकुमार नवसरे सहा. पोलीस निरीक्षक यानी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमंलदार किसन ताडगे व महादेव साळुके याना आदेश दिले होते. गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमंलदार यानी गहाळ झालेले मोबाईलचा तांत्रिक दृष्टया तपास करून त्याचे विश्लेषण करून गहाळ झालेले विविध कंपनीचे ०७ मोबाईल हॅण्डसेट विविध भागातुन तसेच परराज्यातुन हस्तगत केले आहेत.

सदर हस्तगत केलेले विविध कंपनीचे ०७ मोबाईल हण्डसेट कि. रू १,२५,०००/- रू किंमतीचे प्रभारी अधिकारी श्री मनोजकुमार नवसरे सहा. पोलीस निरीक्षक सुपा पोलीस स्टेशन यांचे हस्ते तकारदार याना सपुर्द करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी ही मा. संदीष गिल्ल सती, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार सो अप्पर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा. सुदर्शन राठोड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री मनोजकुमार नवसरे सस्रो, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, गुन्हे शोध पथकाचे अमंलदार किसन ताडगे, महादेव साळुंके यांनी केली आहे.

सुपा पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मोबाईल गहाळ झाल्यास त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, जेणेकरून लवकरात लवकर कारवाई करता येईल.
.......
To Top