इंदापूर प्रतिनिधी :
शेळगांव ता. इंदापूर येथे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आंघोळीसाठी घराबाहेर पडत असताना एका महिलेची तिच्याच पतीकडून हत्या झाल्याची गंभीर घटना घडली. पतीने लाकडी वस्तूने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सौं.मनीषा मल्हारी खोमणे (वय 35) रा. शेळगांव ता. इंदापूर ही अंघोळीसाठी घरातून बाहेर जात असताना संशयित आरोपी पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने पाठीमागून येत तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात मनीषा जागीच कोसळली आणि गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तातडीने तिला इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही दरम्यान ही हत्या कौटुंबिक वादातून झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर, पोलीस हवालदार दादासाहेब डोईफोडे आणि पोलीस कर्मचारी गुलाब पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेची माहिती घेतली. बापू खोमणे याने आपल्या पत्नीचा खून का केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेनंतर बापू खोमणे हा फरार झाला होता. मात्र पोलिसांकडून संशयित पतीचा काही तासातच शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.
..............
,,

