सुपर ट्रेकर वेलफेअर ग्रुप आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मनोज साठे यांच्या पुढाकाराने आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींवर बोलकी व शैक्षणिक चित्रे काढण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेचा परिसर अधिक आकर्षक व प्रेरणादायी बनला आहे
या चित्रांमधून अक्षरओळख, अंकज्ञान, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक मूल्ये तसेच प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. लहान वयातील मुलांना खेळातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ तसेच सुपर ट्रेकर वेलफेअर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत मनोज साठे व सुपर ट्रेकर टीमचे कौतुक केले.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शासकीय शाळांबद्दल विद्यार्थ्यांचा ओढा वाढण्यास निश्चितच मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
.......

