Birthday news ! पानिपत वीर सरदारांच्या सातव्या वंशजांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी : 
लोणी भापकर (ता.बारामती) येथील पानिपतच्या रणभूमीवर पराक्रम गाजवणारे वीर सरदार श्रीमंत सोनजी गोरखोजी भापकर यांचे सातवे वंशज श्री. विजयसिंह भैय्यासाहेब भापकर यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस नुकताच कुटुंबीय, आप्तेष्ट व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी पारंपरिक पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील मान्यवर, इतिहासप्रेमी तसेच भापकर कुटुंबीयांनी श्री. विजयसिंह भापकर यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या पूर्वजांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचा वारसा जपत समाजसेवेसाठी दिलेले योगदान याबद्दल उपस्थितांनी त्यांचा गौरव केला.
ऐतिहासिक वारसा लाभलेले  लोणी भापकर येथील एक संयमी आणि कर्तुत्वान व्यक्तिमत्व, पानिपत वीर सरदार  श्रीमंत सोनजी गोरखोजी भापकर यांचे ते सातवे वंशज असून त्यांनी गावच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी हरिजन (मातंग) समाजासाठी, समाज मंदिरासाठी जागा दान दिली आहे. तसेच लोणी भापकर विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे 14 वर्ष चेअरमन पद यशस्वीरित्या संभाळले आहे. त्यानंतर  त्यांनी 5 वर्षे  निरा कॅनॉल सोसायटी सहकारी खरेदी विक्री संघ बारामती येथे संचालक म्हणून काम पाहिले आहे. 
 या कार्यक्रमासाठी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराव (तिसरे) यांचे आजोबा श्रीमंत पृथ्वीराज फत्तेसिंह  राजे भोसले, माळेगाव संस्थानचे अधिपती श्रीमंत महेंद्रसिंह जाधवराव, वडगाव निंबाळकर संस्थानचे राजे भालचंद्र राजे, कुमार राजे,अनिल राजे, सरनोबत सरकार कोल्हापूर, सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर,माजी सरपंच रवींद्र भापकर, सामाजिक कार्यकर्ते दारासिंह भापकर-पाटील,  रोहिदास भापकर  यांच्यासह या सोहळ्याला गावातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाजातील ग्रामस्थ, पै पाहुणे तसेच कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   या कार्यक्रमात त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.हा सोहळा आनंद, अभिमान आणि इतिहासाच्या स्मृतींनी भारलेला ठरला.
To Top