School : लोणी भापकर परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना नऊ लॅपटॉपचे वाटप! डिजिटल शिक्षणासाठी सिग्नेट टेक्नॉलॉजी कंपनीचा सामाजिक उपक्रम!

Vijay Golande
     न्यू स्टेट 7 प्रतिनिधी  : 
 लोणी भापकर  (ता. बारामती)   येथे सिग्नेट टेक्नॉलॉजी एचडीडी प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) फंडातून   जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना  नऊ लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल भापकर यांच्या प्रयत्नातून व  सिग्नेट टेक्नॉलॉजी कंपनीचे सीएसआर फंड व्यवस्थापक ताराचंद भापकर यांच्या सहकार्यातून यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
 या मध्ये  लोणी भापकर, शिंदे मळा, जगदाळेवाडी, भापकर वस्ती, ठोंबरे वस्ती, ढोले मळा  व सायंबाची वाडी  या ठिकाणी लॅपटॉप देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी तसेच डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या लॅपटॉपमुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक प्रभावी, सोपे आणि आधुनिक होणार असून ऑनलाईन शिक्षण, प्रोजेक्ट्स, शैक्षणिक व्हिडीओ आणि संगणक साक्षरतेस चालना मिळणार आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी वृक्ष प्रेमी नवनाथ (काका) भापकर यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राहूल भापकर, सीएसआर फंड व्यवस्थापक ताराचंद भापकर,वृक्ष प्रेमी नवनाथ (काका) भापकर,  माजी सरपंच व विद्यमान सदस्य रवींद्र भापकर,  माजी सरपंच विजय बारवकर, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष दिलीप जगदाळे,माजी उपसरपंच आबा ठोंबरे, न्यू इंग्लिश स्कूलचे सहसचिव विजयसिंह भापकर, माजी उपसरपंच दिलीप बारवकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भापकर व नंदकुमार मदने, न्यू इंग्लिश स्कूल व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज साठे, शिंदेमळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  विकास भोसले, लोणी भापकर व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन भापकर, बलुतेदार संघटना अध्यक्ष दादा कडाळे, विकास सोसायटी संचालक, नवनाथ भापकर, सायंबाचीवाडीचे माजी उपसरपंच शरद भापकर, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज मदने, सामाजिक कार्यकर्ते सनी लांबाते,  दूध संस्था चेअरमन रमेश भापकर, सामाजिक कार्यकर्ते  माऊली भापकर, चेतन मोरे, निलेश गोलांडे, तुकाराम गायकवाड, दत्त इलेक्ट्रॉनिकचे व्यवस्थापक  नामदेव ठोंबरे, लॅब असिस्टंट  वीरेंद्रसिंह भापकर, कराडे फोटोचे व्यवस्थापक प्रकाश कराडे, पालक प्रिया मोरे, रेणुका शेजवळ, प्रिया पवार,  लोणी भापकर मुख्याध्यापीका वैशाली गायकवाड उपशिक्षिका, सुप्रिया यादव,कौशल्या बारवकर, शिंदेमळा मुख्याध्यापक  संजय बारवकर, भापकर वस्ती मुख्याध्यापक प्रकाश कोंडे, जगदाळेवाडी मुख्याध्यापक रेवणनाथ परकाळे,ठोंबरे वस्ती मुख्याध्यापक प्रमोद शेळके, ढोले वस्ती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर भापकर शिक्षकवर्ग, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना राहुल भापकर यांनी सांगितले की,  शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारा हा उपक्रम असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम होईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी डिजिटल साधनांची नितांत गरज असून, हा उपक्रम त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
ताराचंद भापकर यांनी भविष्यातही अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा व शाळा डिजिटल करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
रवींद्र भापकर व श्रीकांत भापकर यांनी सिग्नेट टेक्नॉलॉजी एचडीडी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच राहुल भापकर, व ताराचंद भापकर यांचे आभार मानत या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच ग्रामपंचायती च्या  माध्यमातून शाळेसाठी कायम सहकार्य करू असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ढोले वस्ती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर भापकर यांनी केले. तर प्रास्ताविक  उपशिक्षिका, सुप्रिया यादव  यांनी केले. शेवटी शाळेच्या वतीने आभार  शिंदेमळा मुख्याध्यापक  संजय बारवकर यांनी मानले.
To Top