लोणी भापकर :- बारामती तालुक्यातील राजकीय दृष्ट्यामहत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोणी भापकर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी स्वाती अविनाश बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळते उपसरपंच तानाजी पवार यांनी
राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नूतन उपसरपंच
निवडीसाठी सरपंच गितांजली भापकर यांच्या
अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी
उपसरपंच पदासाठी स्वाती बनसोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणारे ग्रामविकास अधिकारी उज्ज्वला शिंगाडे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यानंतर नूतन उपसरपंच यांचा सरपंच गितांजली भापकर, बारामती पंचायत समितीचे मा.सदस्य राहुल भापकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, श्रीकांत भापकर, नंदकुमार मदने, कविता आरडे,आशा भापकर यांच्या सह मा.उपसरपंच पदमनाथ कडाळे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज मदने, दलित पँथरचे बारामती तालुका अध्यक्ष अविनाश बनसोडे, ऋषिकेश भापकर ,जयराज भापकर,किरण मोरे, बापू माकर,अमोल मदने, सागर बनसोडे, शुभम खोमणे,राजू मदने , सोपान मदने ,अतिष मोरे,अभि पवार यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडीनंतर झालेल्या सत्कार समारंभात सौ. स्वाती बनसोडे यांचा शाल, श्रीफळ वं पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे आभार मानत गावाच्या सर्वांगिण विकासासाठी, पारदर्शक कारभारासाठी व लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच तालुका पातळीवरील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. बिनविरोध निवड झाल्याने गावात समाधानाचे वातावरण असून ग्रामविकासाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
.........

