सायंबाचीवाडी ( ता. बारामती ) येथील राहुल जगन्नाथ भापकर यांची स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
बैठकीस राज्याचे प्रदेश अध्यक्ष, राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तसेच तालुका अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य तसेच तालुक्यातील विविध गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते. निवडीनंतर राहुल भापकर यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या वेळी बोलताना नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष राहुल भापकर म्हणाले की, पक्षाचा विस्तार, जनतेच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण, तसेच कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
.......

