death : देवदर्शनाहून परत येताना भीषण अपघातत; पती-पत्नीचा मृत्यू ! दोन मुले जखमी, प्रकृती स्थिर ! बारामतीत शोककळा पसरली !

Vijay Golande
 न्यू स्टेट 7 प्रतिनिधी : 
बारामती :  दि. ०३ डिसेंबर - देवदर्शन करून गावाकडे परत येत असलेल्या बारामतीतील पती-पत्नीचा आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.  ही दुर्घटना कर्नाटक राज्यातील हुबळी नजीक  घडली. दरम्यान या अपघातात त्यांच्या दोन्ही मुलांना मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 मिळालेल्या  माहितीनुसार, येथील डायनामिक्स डेअरी मध्ये कार्यरत असलेले अनिल सदाशिव जगताप वय (50) व त्यांची पत्नी वैशाली अनिल जगताप वय (45),त्यांची दोन्ही मुले अथर्व वय (24) व अक्षता वय (20) तिरुपती बालाजीला दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून पुन्हा घराकडे येत असताना बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास हुबळीनजिक एका ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने जगताप कुटुंबीयांची  गाडी मागून जाऊन ट्रकवर जोरदार  आदळल्याने हा अपघात झाल्याचे समजले. या अपघातात अनिल जगताप व वैशाली जगताप यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेली दोन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर हुबळीतील रुग्णालयात उपचार सुरु असून याच गाडीमध्ये त्यांच्या नातेवाईकांचा एक लहान मुलगाही होता, सुदैवाने त्यालाही फारशी दुखापत झाली नसल्याचे समजले. या घटनेमुळे बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
..........


To Top