Medal : मध्यप्रदेशात सक्षम यादवने घेतली हनुमान उडी ! मोरगाव ग्रामस्थांनी उभारली विजयाची गुढी !

Vijay Golande
 न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी :
मध्य प्रदेशातील इंदौर येथे नुकत्याच  झालेल्या नॅशनल स्कूल्स  गेम्स ॲथलेटिक्स  स्पर्धेत  मोरगाव (ता. बारामती)  येथील सक्षम सचिन यादव याने हनुमान उडी घेत यशाचा झेंडा रोवाला. या स्पर्धेत  सक्षम याने १४ वर्षाखालील झालेल्या राष्ट्रीय गोळा फेक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक पटकावीत राणापदक मिळवल्या बद्दल मोरगाव ग्रामस्थांनी हलगीच्या निनादात, ढोल -ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत  भव्य मिरवणूक काढत विजयउस्तव साजरा करत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा तो विद्याथीं आहे. विशेष बाब म्हणजे त्याने कोणताही कोचिंग क्लास, कोणतीही ॲकॅडमी  लावली नाही. त्याने कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्रातीलच नव्हे तर जवळपास २५ राज्यातून आलेल्या प्रचलित अकॅडमीवाल्या मुलांचा पराभव केला. या यशामध्ये त्याची आई शितल यादव व वडील सचिन यादव  यांनी अपार कष्ट घेऊन सक्षम ला प्रोत्साहन दिले  तसेच मुख्याध्यापक अर्जुन कोकरे, पर्यवेक्षिका नंदा नाझिरकर, क्रीडा शिक्षक रमेश शेवते, सहाय्यक शिक्षक अमित आव्हाळे, प्रसिद्धी विभाग प्रमुख सारिका आवाळे यांनी मार्गदर्शन केले.
.........

To Top