लोणी भापकर ता.बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात
भारत सरकारच्या माळेगाव खुर्द येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस
प्रबंधन संस्था यांच्यामार्फत डी.ए. पी. एस. सी. हा कार्यक्रम मागासवर्गीयांचे जीवनमान
उंचावण्यासाठी राबविला जात आहे. कार्यक्रमांतर्गत लोणी भापकर येथे लाभार्थ्यांना किचन संचाचे
वाटप करीत लाभ देण्यात आला. संस्थेचे डायरेक्टर डॉ. के. सामी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी डॉ कुराडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत लोणी भापकर ने गावातील अनुसूचित जातीच्या १३० कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली होती, त्यापैकी जवळपास ९० कुटुंबांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. आणि जे राहिले आहेत त्यांना सुध्दा लवकरच वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.याप्रसंगी डी. ए. पी. एस. सी.समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन कुराडे,समितीचे सदस्य डॉ. राजगोपाल, डॉ. धनंजय नांगरे, डॉ.जे.एस.कदम, डॉ. के.पाल, आदित्य वाघमारे,रोनित कदम लोणी भापकरचे मा.सरपंच व विद्यमान सदस्य रवींद्र भापकर ,ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भापकर ,कृषी अधिकारी बापूराव लोधाडे ,दलित पॅंथरचे बारामती तालुकाध्यक्ष अविनाश बनसोडे, मा.ग्रामपंचायत सदस्य पदमनाथ कडाळे, राणबा मोरे,राजेंद्र कडाळे, दत्तात्रय मोरे, सचिन कांबळे आदी प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
.......

