बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील श्री दत्त मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी भापकर येथे श्री दत्त दशभुजा मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. या मंदिरातील दहा हात असलेली दत्तमूर्ती हे येथील आकर्षण आहे. तसेच शेजारीच बाराव्या शतकातील पांडवकालीन, शिवमंदिर आहे.
या ठिकाणी परमहंस दत्तानंद स्वामी सरस्वती महाराज यांची संजीवन समाधी आहे. या ठिकाणी नरसिंह सरस्वती पादुकांची स्थापना स्वतः दत्तानंद स्वामी सरस्वती महाराज यांनी केले आहे. या ठिकाणी पुरातन पुष्करणी असलेल्या बारवेच्या काठावर दत्त मंदिर व शेजारी वराहमूर्ती पाहायला मिळते.
दत्त जन्म सोहळ्यानिमित्त पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दि.04/12/2025 रोजीसकाळी 7 वाजता महा अभिषेक व नित्यपुजा दुपारी 3 ते 4 वाजता
लोणी भापकर चे बाल कलाकार तबला वादक अभिमन्यू प्रकाश कराडे, हार्मोनियम वादक : वीर प्रकाश कराडे या बंधूंचे गायन व वादन,दुपारी 4 ते 5 वाजता जेष्ठ नागरिक कलामंच स्वरमंदिर धायरी पुणे यांचे सुगम संगीत तबला साथ: श्री. श्रीकांत एकबोटे / हामर्मोनियम साथ : श्री. मुकुंद दिवाण, सायंकाळी 5 ते 5 वा. 45 मि. श्री भैरवनाथ भक्त भजनी मंडळ लोणी भापकर यांचे भजन होणार आहे. सायंकाळी 5. वा. 45 मि.: श्री दत्त जन्म सोहळा सूर्यास्ता वेळी होईल. यावेळी पुष्पवृष्टी करण्यात येते त्यानंतर खिरापत व सुंठवडा वाटण्यात येईल. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी
शुक्रवार दि. 5/12/2025 रोजी सकाळी 9:00 वा. रुद्राभिषेक व दुपारी 1 वा. नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्रींच्या पालखीची श्री दत्त मंदिरातून गावातील भैरवनाथ मंदिरा पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तिसऱ्या दिवशी शनिवार दि. 06/12/2025 रोजी सुपे येथील क्षीरसागर बंधू यांच्या वतीने सकाळी 9.00 वा. लघुरुद्र अभिषेक व दुपारी 1 वा. नंतर महाप्रसाद (भंडारा) घातला जाणार आहे. अशी माहिती श्री दशभुजा दत्तसंस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गोलांडे, कार्याध्यक्ष बापूसाहेब गोलांडे व सचिव एस एल तथा श्रीकांत भापकर यांनी दिली.
.........

