Ncp : बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी - संदीप बांदल !

Vijay Golande
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार ) गटाच्या  अध्यक्षपदी संदीप बांदल यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी प्रेमीं कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करत आनंद उत्सव साजरा  होत आहे.
  बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संदीप बांदल यांची राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आल्याचे सांगितले . याप्रसंगी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप बांदल यांनी यापूर्वी बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी काम केले असल्याने तालुक्यातील सर्व गावातील जनतेशी त्यांचा थेट संपर्क आला होता. त्यामुळे ते या पदाला न्याय देतील असा विश्वास असल्याने  त्यांना बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी  काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
     कार्यकर्त्यांची जी भावना होती ती भावना ओळखून  दादांनी स्वच्छ प्रतिमेच्या प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिल्याचे बोलले जात आहे. 
 दरम्यान, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यावर आपला भर असेल अशी प्रतिक्रिया संदीप बांदल यांनी व्यक्त केली.

To Top