Maji vidyarthi : साठी ओलांडलेल्या मित्रांच्या पडल्या बहात्तर वर्षांनी गाठी ! सातवीतील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा !

Vijay Golande
    मोरगाव - निसर्गावर प्रेम केले तरच आपली पुढील पिढी सुखकारक होऊ शकेल यासाठी वृक्षारोपण करा. तसेच समाजात जगत असताना अन्याय सहन करू नका या अन्यायाविरुद्ध पेटून उठा असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी तरडोली ता. बारामती येथे केले. ते सण 1967 सालच्या सातवीच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामध्ये बोलत होते. 
 तरडोली ता. बारामती येथे वयाची  72 वर्षे ओलांडलेल्या इ. सातवीच्या सन 1967 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा येथील  शुभंकर लॉन्स येथे संपन्न झाला. या कार्यक्रमांसाठी  मा.  सनदी अधिकारी सुरेश खोपडे हे  प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तर  1967 सालच्या बॅचचे विद्यार्थी  तथा निवृत्त कमांडर सर्जेराव गाडे, निवृत्त मुख्याध्यापक ज्ञानदेव जाधव, भारत दीक्षित, विठ्ठल चोपडे, रामचंद्र शेरे, विलास कदम, लता येवले /खोपडे, कौशल्य बबन मांढरे/ पवार  आदी  उपस्थित होते. यावेळी उपस्थतांना  मार्गदर्शन करण्यासाठी सुरेश खोपडे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते . यावेळी बोलताना सुरेश खोपडे पुढे म्हणाले की, समाजात राहत  असताना  नेहमी सत्य व असत्याचा सामना प्रत्येकाला करावा  लागतो. सत्य व्यक्त  करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जागृत झाला  पाहिजे. यानंतरच समाजातील विकृत प्रवृत्तीवर. आळा बसेल  असे त्यांनी सांगितले. या  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी तथा निवृत्त कमांडर सर्जेराव गाडे यांनी भूषवले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, सकारात्मक विचार व सेवाभाव हाच निरोगी जीवनाचा मार्ग असल्याचे सांगितले.तब्बल 58 वर्षांनी वय वर्षे बहात्तर असलेल्या विद्यार्थ्यांची ही शाळा तरडोली येथे पुन्हा भरली होती.

या स्नेह मेळाव्यामध्ये प्रत्येकाने आपल्या जीवनाचे अनुभव व शाळेतील आठवणींचा पुन्हा उजाळा वाचून  दाखवला. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी वसंत शिंदे यांनी आयुर्वेदिक डॉक्टर इंद्रजीत कदम यांना निमंत्रणे केले होते. त्यांनी  आयुर्वेदाचे महत्त्व कथन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले. कविता, गायन, मधुर वाणीने, आनंदी वातावरणात हा स्नेह मेळावा संपन्न  झाला. यावेळी शुभंकर लॉन्सचे प्रतिनिधी  प्रणव भोसले यांनी उत्कृष्ट सहाय्य केले.
To Top