सायंबाचीवाडी, ता. बारामती गावात महिलां व बालकांना ॲनिमिया प्रतिबंधित करण्यासाठी ' ॲनिमिया मुक्त .... अभियान राबवण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पुणे जिल्हा परिषद, बारामती पंचायत समिती, सायंबाचिवाडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या माध्यमातून अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ॲनिमियाची लक्षणे, कारणे व प्रतिबंध उपाय याबाबत मार्गदर्शन केले. हिमोग्लोबिन चाचणी शिबिर, लोह गोळ्यांचे वाटप, पोषण आहाराचे महत्त्व, किशोरी आरोग्यवर्धिनी , गर्भवती महिलांसाठी विशेष तपासण्या आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी गावकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी भित्तीचित्र, रॅली बैठकांच्या माध्यमातून संदेश पोहोचविण्याची माहिती देण्यात आली. "बालक-गर्भवती महिला आरोग्यदायी असतील तरच गाव स्वास्थ्यदायी बनेल, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
गावाला निश्चित कालावधीत ॲनिमिया मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्व घटकांनी पुढाकार घेतल्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
*या आरोग्य तपासणी शिबिरा मध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, हिमोग्लोबिन आदी बाबींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी " एकल महिलांना" साडीचोळी व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप,तसेच " दिव्यांगांना" चेक वाटप करण्यात आले.तसेच ग्रामपंचायत कार्यालय स्वप्रकल्प पाहणी, स्वयंभू मंदिर परिसर सुधारणा कामकाज पाहणी, जिल्हा परिषद व अंगणवाडी सीसी टीव्ही पाहणी, "प्रधानमंत्री घरकुल आवास योजना" अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचे गृहप्रवेश व समाज मंदिर, सार्वजनिक सुलभ शौचालय बांधकाम आदीं कामाची पाहणी करण्यात आली.
बारामती पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी नंदन जराडे, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक नवले, आरोग्य विस्तार अधिकार सुनील जगताप , कृषी पंचायत विस्तार अधिकारी सुनील गायकवाड, सरपंच जालिंदर भापकर, उपसरपंच हनुमंत बांदल, ग्रामसेवक युवराज गावडे, ग्रामपंचायत सदस्य रामदास भापकर,दिपाली भापकर,सविता भगत, सामाजिक कार्यकर्ते मनोहर भापकर , जयवंत भापकर, प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर च्या आरोग्य सेविका संगीता मदने, आरोग्य सेवक मुकुंद चव्हाण. लॅब टेक्निशियन कालिदास मदने आशा स्वयंसेविका वंदना बोबडे. सुवर्णा धायगुडे यांच्यासह जेष्ठ नागरिक, महिला, ग्रामस्थ, आदीं मान्यवर मोठ्या संख्येने शिबिरास उपस्थित होते.
.......

