मोरगांव- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने एकता दिवस ( RUN FOR UNITY ) निमित्ताने आज शुक्रवार दि. 31 रोजी 06:30 ते 08:30 या दरम्यान सुपा पोलीस स्टेशन हद्दीत 5 किमी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मॅरेथॉनमध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, पोलीस पाटील, पत्रकार, सुपा पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असे मिळून 200 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. सदर मॅरेथॉन मधील सर्व स्पर्धकांना पोलीस स्टेशन कडून पाणी बॉटल, ORS तसेच केळी व अल्पोहार इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक विटेश्वर शिरसाठ, द्वितीय क्रमांक यश भापकर तर तृतीय क्रमांक पृथ्वीराज शिवणे तसेच महिलांमध्ये प्रथम क्रमांक सविता खडके, द्वितीय क्रमांक नंदिनी दहे , तृतीय क्रमांक प्राची गायकवाड अशा स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देवुन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी सन्मानित केले. यावेळी पी.एस. आय. कोळी, पी.एस. आय. मोहरकर पी .एस. आय. ताकवणे व पोलीस कर्मचारी, पत्रकार, पोलीस पाटील, ग्रामस्थ, व स्पर्धक उपस्थित होते.युवा तरुणांना स्फूर्ती देणार्या सुपा पोलीसांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमांमुळे परिसरातून कौतुक होत आहे.
........

