jatra : काऱ्हाटीत ग्रामदैवत यशवंतराया देवाच्या यात्रेला सुरुवात !

Vijay Golande
     न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी  : 
 बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील ग्रामदैवत श्री यशवंतराया देवाच्या यात्रेला आज  शुक्रवार  दि. 21 रोजी सुरूवात झाली असून तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक व मनोरंजनच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती  श्री यशवंतराया यात्रा कमिटी व ग्रामपंचायत काऱ्हाटी यांच्या वतीने देण्यात आली.
आज पहाटे ५ ते ७ अभिषेक, दुपारी १२ ते ४ देवाचा छबीना रात्री ९ ते १ तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे लोकनाट्य तमाशा होणार आहे.
शनिवार दि.२२/११/२०२५ सकाळी ९ते १ तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे लोकनाट्य तमाशा हजेरी  होणार आहे. या दरम्यान सकाळी ९ ते १२ देवाची भाकनुक, दुपारी ३ ते ६ कुस्त्यांचा जंगी आखाडा  कुस्ती शौकीनांना पाहिला मिळणार आहे. याच दरम्यान
दुपारी ३ ते ६ देवाची भाकनुक, रात्री १० ते ०३  परतीचा छबीना. रविवार दि.२३/११/२०२५ पहाटे ३ ते  ५ गजनृत्य, यावेळेत पहाटे ०५ ते ०८ देवाची भाकनुक
सकाळी ०८ ते १२ छबिना परतीचा, दुपारी १२ ते ०२ देवाची भाकनुक, दुपारी ०२ ते ०४ म्हसोबावाडी देवस्थान निरोप समारंभ यात्रेची  सांगता होईल. 
यशवंतराया यात्रा कमिटी व ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग आदी प्रकारची सोय करण्यात आली आहे.  यात्रा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी भाविकांनी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले.
.........
To Top