CRIME ! वृद्धाने केला आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! वृद्ध फिरत होता थाटात ,तीन महिन्याचा गर्भ पोटात !

Vijay Golande
     इंदापूर   :  तालुक्यातील शेळगाव  येथे  एका वृद्ध नातेवाईकाने आपल्याच नात्यातील  अल्पवयीन मुलीवर  बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.मागील दहा दिवसापूर्वी पिडीत मुलगी तिच्या मावशीकडे आली असता तिने माझ्या पोटात दुखत असून माझी मासिक पाळी ही बंद झाल्याचे सांगितल्यानंतर मावशीने पिडीतेला इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती तीन महिन्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे.
 याप्रकरणी वालचंदनगर पोलीसांत पिडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर नरामधम नातेवाईकाला बेड्या ठोकण्यात आल्या. या घटनेबाबत शेळगाव परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपी नातेवाईकावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळगाव येथे पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसमवेत संबंधित वृद्ध नातेवाईकाच्या घराजवळ सन 2008 पासून राहत आहे. वेळोवेळी या नातेवाईकाचे तिच्या घरी सतत ये-जा होत  होती.
  मागील तीन महिन्यापूर्वी हा वृद्ध नातेवाईक दुपारी घरी आला होता. त्याने पीडितेवर जबरदस्ती केली. शिवाय या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकेल अशी धमकी दिली. धमकी दिल्यामुळे पिडीतेने या प्रकाराबाबत कोणालाही सांगितले नाही. परंतु पीडित अल्पवयीन मुलीला त्रास होऊ लागल्याने सदर प्रकरण उघडकीस आले. या प्रकारामुळे शेळगाव परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या नराधमास पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात उपस्थित केले असता त्याला एक नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
...........






<
To Top