jatra | सायंबाच्यावाडीत ग्रामदैवत स्वयंभू देवाची यात्रा

 लोणी भापकर : बारामती तालुक्यातील सायंबाची वाडी येथील ग्रामदैवत स्वयंभू देवाची यात्रा रविवार दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी चालू होत आहे.रविवार संध्याकाळी 10 वाजता गुरु श्री बिरोबा देव यांच्या उत्सव मूर्ती पालखीचे सायंबाचीवाडी मध्ये आगमन होईल संध्याकाळी 10:30 वा. गुरु श्री बिरोबा देव आणि शिष्य श्री स्वयंभु देव यांची श्री स्वयंभू मंदिरामध्ये भेट होईल व तिथून पुढे श्री स्वयंभु देवाचा (छबिना) पालखी सोहळ्याला सुरवात झाली.
    सोमवार दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 6:30 वा. श्री स्वयंभु देवाची (रास) निघेल व भाकणूक केली जाते. दुपारी 3:00 वा. श्री स्वयंभु देवाची आखत भरली जाते  (नैवेद्य दाखवला जातो)
 सायंकाळी 6:00 वा. श्री स्वयंभु देवाची (रास) निघेल व त्यानंतर
     भाकणुकीचा कार्यक्रम होतो. यात वर्षभरातील पर्जन्यमान व पीक-पाणी यावर भाष्य केले जाते.
    मंदिरात दिवसभर ग्रामस्थ नैवेद्य  व नवस फेडण्याचा कार्यक्रम होतो. रात्री ढोल, लेझीम, झांज पथक आणि गजनृत्याचा कार्यक्रम होतो.
       या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यात्रेनिमित्त गावातील सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
To Top