बारामती - मोरगाव ता.बारामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव अंतर्गत उपकेंद्र तरडोली येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तरडोली गावठाण सह तीन अंगणवाडीमध्ये 0 ते पाच वर्ष अंतर्गत येणाऱ्या सर्व मुलांना पोलिओ देण्यात आला असल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी अश्विनी माने यांनी दिली.
प्राथमिक उपकेंद्र तरडोली यांच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसापासून पात्र मुलांच्या पालकांना मोबाईलद्वारे कॉल करून, ग्रामपंचायतीमार्फत , माईकद्वारे अलाउंसिंगद्वारे जनजागृती करण्यात आली होती. आज दि.12 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून तरडोली गावठाण, अंगणवाडी केंद्र पवारवाडी , भोइटेवाडी, तांबे -धायगुडे वस्त्ती या चार ठिकाणी पल्स पोलिओ देण्यासाठी केंद्र ठेवण्यात आली होती. या जनजागृतिमुले पालक लहान मुलांना घेऊन आले होते.
या पोलीओ लसीकरणासाठी समुदाय आरोग्य अधिकारी अश्विनी सुरज माने, यांसह तीन अंगणवाडी कार्यकर्त्या, तीन मदतनीस, दोन आशा वर्कर, एक आरोग्य सेवक, एक अर्धवेळ स्त्री परिचार उपस्थित होत्या. आज सायंकाळपर्यंत साडेतीनशे पेक्षा अधिक स्थानिक सह , इतर मुलांना पोलिओ दिला जाईल असा अंदाज वैद्यकीय अधिकारी अश्विनी माने यांनी वर्तविला आहे.


