मोरगाव - बारामती तालुक्यातील तरडोली येथे ग्रामपंचायत सरपंच पदी महेंद्र जिजाबा तांबे यांची निवड झाली. या निवड प्रक्रिया साठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली.
बारामती तालुक्यातील तरडोली येथील सरपंच अश्विनी श्रीकांत गाडे यांनी ठरल्याप्रमाणे नियोजित कालावधीत राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. यानुसार आज सरपंच निवड कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. आज सरपंच पदाच्या झालेल्या निवडी प्रसंगी उपसरपंच नवनाथ जयसिंग जगदाळे, सागर पंडित जाधव ,अश्विनी श्रीकांत गाडे ,स्वाती सतीश गायकवाड ,नबाबाई सोमनाथ धायगुडे, अनिता उत्तम पवार ,संतोष संपत चौधरी, विद्या हनुमंत भापकर हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . आज सरपंच पदाच्या झालेल्या निवडीसाठी महिंद्र जिजाबा तांबे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली.
या निवडीनंतर तांबे यांनी बोलताना सांगितले की, गावचा सर्वांगीण विकास हा माझा ध्यास असून गावातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी, शासन दरबारी पाठपुरावा करून वाडीवस्तीवर जाण्यासाठी पक्के रस्ते रस्ते या आवश्यक असणारे गरजा पुरवण्याचा माझा मानस आहे.तसेच गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी लोखंडे मॅडम यांनी कामकाज पाहिले यावेळी तलाठी घोरपडे, ग्राम ग्रामविकास अधिकारी रूपाली मेहेत्रे , कर्मचारी विजया पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.