krushi seva kendra |श्रीनाथ कृषी सेवा केंद्राचे स्थलांतर

लोणी भापकर:  येथील प्रसिद्ध श्रीनाथ कृषी सेवा केंद्र हे दुकान आता नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहे. जुने दुकान मुख्यपेठेतील अरुंद रस्त्यावर असल्याने ग्राहकांना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर मालक श्री. प्रशांत भापकर यांनी दुकानाचे नवे ठिकाण शिरूर - फलटण रस्त्यावरील लोणी भापकर येथे चोपडे हार्डवेअर शेजारी दुकान सुरू केले आहे.
         नवीन ठिकाणी बी-बियाणे, खते , कीटकनाशके, शेती उपकरणे व मार्गदर्शन यांसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. दुकानाचे उद्घाटन विजया दशमी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता  लोणी भापकर गावचे माजी सरपंच तथा सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री बाबासाहेब भापकर व माजी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय भैरवकर, दादा कडाळे, धीरज आवाडे, विशाल भापकर, अमोल बारवकर, डिगांबर गोलांडे, लालासो गोलांडे,अशोक गोलांडे, माऊली भापकर, रोहिदास भापकर, दारासिंग भापकर,  ज्ञानदेव भापकर, रमेश भापकर, सुभाष भापकर, एस. एल. भापकर, संजय बारवकर, सुदाम मदने, नंदकुमार बारवकर, चंदर भापकर, किशोर भापकर,गोविंद भापकर, संजय सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, वैभव वाघ, भिमराव पवार  सुनील भापकर, पदमनाथ कडाळे यांच्यासह शेतकरी, ग्राहक व ग्रामस्थ उपस्थित होते.
                    नवीन ठिकाणच्या स्थलांतरामुळे शेतकरी व ग्राहकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे  त्यांना साहित्य खरेदीसाठी अधिक सुलभता मिळेल असे त्यांनी सांगितले.

To Top