Electric issue ! खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त, महावितरणला दिला आंदोलनाचा इशारा !

Vijay Golande
    लोणी भापकर :  लोणी भापकरसह वाड्या- वस्तीवरील  ग्राहकांना अलीकडच्या काळात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात बलुतेदार संघटना व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत  महावितरण कंपनीच्या कार्यालयात निवेदन देत सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली आहे. यामध्ये सुधारना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
       संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीचे शाखा अभियंता सागर शेलार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये गावातील वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. दिवस रात्र तिचा लपंडाव चालू असतो आणि तासंतास येत नाही. यामुळे घरगुती उपकरणे व्यापारी व्यावसायावरही  याचा मोठा परिणाम होतो. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक  दुरुस्ती करावी, नियोजित वीज खंडित होण्याबाबत अधिसूचना द्यावी आदी प्रकारचे निवेदन देण्यात आले. यावेळी बलुतेदार  संघटनेचे अध्यक्ष दादा कडाळे,  धीरज आवडे, वैभव वाघ, विजय पवार, नवनाथ भापकर, प्रताप कडाळे, पोलीस पाटील संजय गोलांडे  आदी यावेळी उपस्थित होते..
...........

To Top