pur : यंदा पूरग्रस्तांचीरग्रस्तांची दिवाळी अंधारात!सरकारचाच होईना मेळ,पूरग्रतांना ठेचा भाकरी खाण्याची वेळ!

Vijay Golande


बारामती  : अतिवृष्टी होऊन एक महिना उलटत आला तरी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मायबाप सरकारकडून पुरेशी मदत न मिळाल्याने ऐन  दिवाळीत पूरग्रस्तांना ठेचा भाकरी खाण्याची वेळ आली आहे.
       बीड जिल्ह्यातील एका महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, यंदा आमची दिवाळी अंधारात आहे आमच्या नशिबी लाडू कानावले नाही, फटाकडे नाहीत.सरकारकडून अद्याप पर्यंत आम्हाला कुठलीच मदत न मिळाल्याने दिवाळी साजरी कशी करणार. होतं नव्हतं तेवढं सर्व वाहून गेले. घरात पाणी शिरले, गोठ्यात  पाणी शिरले, शेतात पाणी शिरले आणि आमची काळी आई वाहून गेली. जनावरे मेली, घरातील पैसा अडका, धनधान्य सर्व पाण्याबरोबर गेलं. सरकारकडून कसलीच मदत मिळाली नसल्याने आम्ही ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला बाजरीची भाकरी आणि मिरचीचा  ठेचा खावा लागत आहे.
      निसर्ग कोपला आणि मुळासकट सर्व ओरबाडून घेऊन गेला. आमच्या व्यथा कोण समजावून घेणार.  अनेक दानशूर लोक मदत पाठवत आहेत. परंतु पुरेशी मदत आमच्यापर्यंत पोचत नाही. मंत्री येतात आश्वासन देऊन जातात. दिवाळी पूर्वीच पुरेशी  मदत मिळणार होती परंतु ती मिळाली नाही. त्यामुळे आमची दिवाळी  अंधारातच असल्याचे पूरग्रस्तांनी सांगितल.
To Top