लोणी भापकर, ता. बारामती येथे नुकतीच आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.
यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच विजय बारवकर, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार मदने, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मनोज मदने, भूमिपुत्र ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्ष जयदीप भापकर, संचालक सतीश आमराळे, माजी उपसरपंच संतोष खैरे, दादा जाधवराव विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय भापकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल मदने, सचिन खोमणे, किरण खोमणे, अशोक मदने, विजय लांडगे, स्वप्नील मदने यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान त्यांनी देश हितासाठी. दिलेला लढा व समर्पित केलेले आयुष्य या विषयी अनेक मान्यवरांनी प्रबोधन केले. तसेच सायंकाळी संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतीमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.