लोणी भापकर गावावर सी सी टिव्ही ची नजर

लोणी भापकर ता. बारामती येथे चोऱ्या व  दरोड्या पासून गावचे संरक्षण व्हावे म्हणून मुख्य चौकात गेल्या दोन वर्षा पूर्वी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या लोक वर्गणीतून सी सी टिव्ही  कॅमेरे बसवण्यात आले होते.
      दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कॅमेरे बंद पडल्याची तक्रार अनेक ग्रामस्थ वारंवार करत होते. परंतू कॅमेरे दुरुस्त होत नसल्याने बलुतेदार संघटना व ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतून  नवीन फिरते  कॅमेरे गावातील  मुख्य चौक व. न्यु इंग्लिश स्कूल विद्यालय रोड या ठिकाणीं बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरा बसविल्यामुळे गावातील  मोटार सायकल चोरी. घरफोडी, जनावरांची चोरी,  शालेय विद्यार्थिनींची होणारी छेड - छाड  या सर्वांवर आळा बसणार  आहे. तसेच ग्रामस्थांना 24 तास फुटेज पाहता येणार असल्याचे संघटनेचे कार्यकर्ते दादा कडाळे, धीरज आवाडे, महेश खोमणे,  सचिन खोमणे यांनी सांगितले. या वेळी पोलिस पाटील संजय गोलांडे, स्वयंभूनगर सोसायटीचे संचालक राजेंद्र पवार, दुग्धव्यवसायीक व माहिती सल्लागार मनोज वाघ, पुणे सहकार बोर्डाचे संचालक संजय बारवकर, शेतकरी संघटना माजी तालुका अध्यक्ष अमोल बारवकर, माजी उपसरपंच 
सुदाम मदने,अंकुश गोलांडे, खानसाहेब आत्तार, आब्बास तांबोळी, हनुमंत सुतार आदी उपस्थीत होते.
       कॅमेरे बंद असल्याबाबत माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर म्हणाले कोणताही कॅमेरा बंद नसून सर्व कॅमेरे चालू आहेत. आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने  प्राथमिक आरोग्य केंद्र, दूध डेअरी, प्राथमिक शाळा - हायस्कूल, आलोक कांबळे येथून शाळेकडे जाणारा रोड, विठ्ठल गोलांडे वस्ती रोड, पळशी रोड, मुढाळे रोड , मातंग समाज - भोसले वस्ती रोड, बाळासाहेब जाधव फिटर येथील रोड, बारवकर मळा रोड, प्राथमिक आरोग्य केंद्र , लोणी पाटी या ठिकाणी वाढीव कॅमेरे बसवून गावात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी सी सी टिव्ही कॅमेरे बसविणार. आहे..
To Top