Baramati | जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार बापू ठोंबरे यांना प्रदान.


लोणी भापकर, ता. बारामती येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील आदर्श शिक्षक बापू ठोंबरे सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला.
        खेड तालुका मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  या प्रसंगी शिक्षक आमदार  जयंत आसगावकर, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते, पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी  भाऊसाहेब कारेकर, मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, मुख्याध्यापक  व्ही एम गुरव  उपस्थीत होते.
         बापू ठोबरे सर हे गेल्या चौदा वर्षापासून अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांच्या चारित्र्यवान, सुसंस्कृत  व कार्यक्षम पिढी घडविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत  त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
To Top