नायकोबा विविध कार्यकारी विकास सोसायटीची 65 वी सर्वसाधारण सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.
लोणी भापकर येथील नायकोबा विविध कार्यकारी विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा राम मंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजता पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विकास अण्णा बारवकर होते. सभेपुढील विषयाचे वाचन संस्थेचे सचिव अनिल गावडे यांनी केले
सर्वसाधारण सभेपुढील 1 ते 11 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. संस्थेचे भाग भांडवल 22.26 लक्ष, राखीव निधी 20.12 लक्ष, इमारत निधी 22.61 लक्ष, सभासद कर्ज 588.91लक्ष, बँक कर्ज 537.75, ना परत ठेव 16.00 लक्ष. कर्जमाफीच्या नावाखाली सभासदांनी परत कर्ज फेड केली नसल्याने संस्था चालू आर्थिक वर्षात तोट्यात आली आहे. त्यामुळे डीव्हीडंट
वाटप करता येणार नसल्याचे संचालक मंडळाने सांगितले. दरम्यान पळशी येथील नायकोबा विविध कार्यकारी विकास सोसायटी नंबर - 2, व श्री दत्त दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था लोणी भापकर यांची सर्वसाधारण सभाही यावेळी पार पडली. संस्थेचे सचिव सदाशिव तात्या जायपत्रे यांनी विषय वाचन केले. सभे पुढील 1 ते 11 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
60 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या संस्थेच्या इमारतीचे 2000 स्क्वेअर फुटाचे काम सध्या सुरू असून यामध्ये तीन ऑफिस व एक मीटिंग हॉल बांधण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. सध्या दूध उत्पादक सभासद अडचणीत असल्यामुळे दूध संघाकडून मिळणारा 40 पैसे बोनस व संस्थेला मिळणारा 30 पैसे बोनस असा एकूण 70 पैसे सर्वच्या सर्व बोनस दूध उत्पादक सभासदांना देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विकास आण्णा बारवकर यांनी जाहीर केले. सभासदांची दिवाळी गोड होणार असल्यामुळे यावेळी संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांनी अध्यक्षांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले व आभार मानले.