बारामती : येथील फलटण चौकात डंपरने सायकलला धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाला असून बारामतीकरांनी रस्ता रोको आंदोलन करत डंपरवर दगडफेक केली.
बारामती शहरात आज दुपारी मारुती उमाजी पारसे (वय 75 ) राहणार आनंदनगर फलटण चौक बारामती या सायकलस्वारास शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीच्या हायवा डंपर ने जोरदार धडक दिल्याने पारसे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बारामती शहरात तनावाचे वातावरण निर्माण झाले असून लोक रस्त्यावर उतरले आहेत. दोन महिन्यापूर्वीच बारामतीत एकाच कुटुंबातील तिघांना धडक दिल्याने मुलींचा मृत्यू झाल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा रक्ताच्या चिळकांड्या डोळ्यात देखत रस्त्यावर पाहायला मिळाल्या अन बारामतीकरांच्या हृदयाचा ठोकाच चुकला . शहरात मृत्युंचे सत्र थांबता थांबेना त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच लक्ष घालावे नाहीतर अनेकांना आपला जीव गमावावा लागेल.
भरधाव डंपरला शहरात बंदी घालावी अशी मागणी बारामतीकरांनी यावेळी केली आहे.